चैत्र प्रतिपदा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रातील शालिवाहन राजाने शक संवत्सर म्हणजेच कालगणनेची नवी पद्धत या दिवसापासून सुरु केली.
नव्या वर्षाचे स्वागत म्हणजे जुने सगळे मागे टाकून नव्याचा स्वीकार करणे, झाडांना नवी पालवी फुटते, बहराचा वसंत ऋतू सुरु होतो, सारे जग नवचैतन्याने बहरलेले असते.
कळकाची काठी रोवून त्यावर नवे वस्त्र घालून साखरगाठी व कडुनिंबाचे पाने बांधून एका तांब्याने सर्व झाकून आपण नव्या वर्षाचे स्वागत करतो.
महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून ति
पूजा करू लागले. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले, असे मानले जाते. हीच परंपरा कायम ठेऊन गुढीपाडवा साजरा केला जातो.
या दिवशी घराची स्वच्छता केली जाते. आंघोळ करून नवे कपडे परिधान केले जातातदेवघरासमोर फुले,फळे यांची आरास करुन देवपूजा करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून
त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. जवळपासच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. दुपारी शाकाहारी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला जातो.
नववर्ष स्वागतासाठी दरवाजावर तोरण बांधतात. दारापुढे रांगोळी काढतात. नवीन कपड्यांची
खरेदी, करतात वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ,सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.
Comments
Post a Comment